नाशिक : खासगी ट्रॅव्हल्सनी निश्चित दरानुसारच भाडे आकारावे

खासगी बस www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खासगी प्रवासी बस व वाहने यांनी निश्चित केलेल्या दरानुसार भाडे आकारणी करावी, असे सूचनावजा आवाहन नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे. खासगी प्रवासी वाहनधारकांना केली आहे.

दिवाळी सणामुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्याचा फायदा घेत खासगी वाहनचालक प्रवाशांकडून अवाच्या सव्वा भाडे आकारत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आवाहन केले आहे. भाडे आकारणीबाबत 27 एप्रिल 2018 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विविध संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेण्यात आले आहेत. त्यानुसार खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या-त्या संवर्गातील संपूर्ण बससाठी येणार्‍या प्रतिकिमी भाडे दराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत.

संकेतस्थळावर तक्रार करावी..
शासन निर्णयानुसार निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने भाडे आकारणी केल्यास किंवा प्रवास करताना येणार्‍या अडचणींची तक्रार प्रवाशांनी [email protected] या ई-मेल आयडीवर नोंदवावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी कळविले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : खासगी ट्रॅव्हल्सनी निश्चित दरानुसारच भाडे आकारावे appeared first on पुढारी.