Site icon

नाशिक : गणेशवाडीतील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात पितळी पादुकांची चोरी; संशयित सीसीटीव्हीत कैद

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : गणेशवाडी, अमरधाम रोडवरील सप्तशृंगी देवीच्या मंदिरातील पितळी पादुका अज्ञात चोरट्याने पहाटेच्या सुमारास लंपास केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र हा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहे.

गणेशवाडी येथील सप्तशृंगी मंदीरात शनिवारी (दि. २७) पहाटे ३:२३ वाजताच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने मंदिरातील देवीच्या मूर्तीसमोर ठेवलेल्या दीड किलो वजनाच्या पादुका चोरून पोबारा केला. या चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. सकाळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिरात पादुका दिसत नसल्याने चोरीची घटना उघड झाली असून, या चोरीच्या घटनेबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहे.

The post नाशिक : गणेशवाडीतील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात पितळी पादुकांची चोरी; संशयित सीसीटीव्हीत कैद appeared first on पुढारी.

Exit mobile version