नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेलरोडला मॉकड्रिल

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच काही अनुचित प्रकार घडल्यास या प्रसंगाला पोलिसांनी कसे सामोरे जायचे व परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची यासंदर्भात जेलरोड येथील नारायण बापूनगर चौकात उपनगर पोलिसांच्या वतीने मॉकड्रिल अर्थात दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली.

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशाने दंगा काबू योजना राबविण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली. त्यात उपनगरच‌े 62, नाशिकरोडच‌े १७, देवळाली कॅम्पच‌े १३, मुख्यालयाच‌े तसेच अग्निशामककडील कर्मचारी हजर होते.

हेही वाचा:

The post नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेलरोडला मॉकड्रिल appeared first on पुढारी.