नाशिक: गणेशोत्सवाबरोबरच उद्यापासून जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वास प्रारंभ

पर्युषण पर्व www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जैन बांधवाचा पर्वाधिराज महापर्व दशलक्षणी पर्व  म्हणजेच पर्युषण पर्व या धार्मिक सणाची सुरूवात देखील गणेशोत्सवासोबतच बुधवार (दि.31) पासून होत आहे.

पर्युषण पर्व हा सण केवळ भारतातच नाही तर विदेशातील समाज बांधवही हा पर्व हा मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहेत. यंदाचा महापर्व हा बुधवार दि. ३१ ऑगस्ट ते 9 सप्टेंबर पर्यंत असा दहा दिवस सुरू राहणार असून या वर्षातील जैनबांधवांमध्ये अत्यंत महत्वाचा  मानला जातो. पर्वास सार्वत्रिक असे स्थान प्राप्त झाल्याने जैन समाजबांधवांमध्ये मग कोणत्याही पंथाचा असो ज्या ठिकाणी जैनमंदिर अथवा जैन स्थानक आहे. त्या ठिकाणी पर्युषण पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या पर्वात अंतरंग शुद्धीचे पूर्व असे समजले जाते. तसेच भगवंताची पूजा, आराधना, महाअभिषेक, त्याग, वैराग्य आणि संयम यांची पुष्टी करणारे  असे पर्व आहे. यामध्ये अहिंसा, दया इत्यादी आत्मगुणांचे पोषण केले जाते. मनोविज्ञान व शरीर विज्ञान यांचे अत्यंत निकटचे संबध असतात ते पर्व आत्मनिरिक्षण, आत्मपरिक्षण आणि आत्मविकास करण्यासाठी सतत सावधान करित असतात. त्याचप्रमाणे गोर गरिबांना दान करणे, शास्त्रदान, आहारदान, अपंगाला सहाय्य करणे, अन्न्दान करणे अनेक संस्थाना रुग्णालयांना आर्थिक मदत उपलब्ध करुन देणे. भाविकांनी यथाशक्ती दान करणे असे अनेक लोकोपयोगी कार्ये या पर्वात जैन बांधवाकडून करण्यात येतात. तसेच स्वाध्याय, ध्यान, तप, जप, पुजा अशा विविध अध्यात्मामध्ये तल्लीन होऊन स्वविषयीचा अभ्यास केला जातो. यामध्ये आपण कोण आहोत ? आपण कोठे असले पाहिजे, कोठे आहोत व आपण ते साध्य करित आहोत का? अशा प्रश्नांना सामोरे जाउन त्याचे उत्तर शोधण्याचा हा काळ म्हणजेच एक अध्यात्म पर्व मानले जाते.

हेही वाचा:

The post नाशिक: गणेशोत्सवाबरोबरच उद्यापासून जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वास प्रारंभ appeared first on पुढारी.