नाशिक : गावठी कट्टा विक्रीस आलेल्या दोघांना अटक

Atak www.pudhari.news

नाशिक (सिन्नर/दातली) : पुढारी वृत्तसेवा
मुसळगाव औद्योगिक वसाहत परिसरात गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस, दोन मोबाइल, एक मोटरसायकल, एक पावती असा एकूण 1 लाख 70 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आतिफ रफिक शेख (23, रा. रोहिदास चौक, इंदिरानगर, ता. वैजापूर) आणि अय्याज अहमद शेख (26, रा. खंडोबानगर, बेळगाव रोड, ता. वैजापूर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मुसळगाव औद्योगिक वसाहत परिसरात गावठी कट्टे विक्री करण्यासाठी दोघे जण येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या पथकाने एमआयडीसी परिसरात हॉटेल गुलमोहरसमोर सापळा रचत दोन संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मंगळवारी (दि. 1) रात्री आठच्या दरम्यान दोन तरुण सिन्नरहून शिर्डीकडे काळ्या लाल रंगाच्या बजाज पल्सर मोटरसायकलवर जात असताना आढळून आले. सदर तरुणांना थांबवून त्यांची चौकशी करून झाडाझडती घेतली असता दहा हजार रुपये किमतीचे चंदेरी रंगाचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस मिळून आले. सदरचा मुद्देमाल व दोघा संशयित आरोपींची एमआयडीसी पोलिस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलिस उपनिरीक्षक नाना शिरोळे, हवालदार रवींद्र वानखेडे, नवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

स्टाइस परिसरात खळबळ….
दोघा संशयितांकडून कट्टा हस्तगत केल्याने स्टाइस परिसरात खळबळ उडाली आहे. कसून तपासाचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : गावठी कट्टा विक्रीस आलेल्या दोघांना अटक appeared first on पुढारी.