नाशिक : गिरणातील वाळू उपास्याविरोधात भऊर, विठेवाडी, सावकीतील ग्रामस्थ एकवटले

वाळू उपसा विरोध

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

गिरणा नदीच्या पाण्यावर भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा आदी गावाचे अस्तित्व टिकून आहे. नदीतील वाळू उपसा झाल्यास आवर्तनावेळी नदीत पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता राहणार नाही यामुळे शेती व्यवसाय उद्धस्थ होईल. त्यामुळे परिसरात वाळूचा उपसा होऊ न देण्यासाठी या गावांतील ग्रामस्थ एकवटले असून वाळू उपास होऊ न देण्याचा निर्णय या गावांनी घेतला आहे.

अवैध वाळू उपशाला आळा बसण्यासाठी आणि नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन वाळू धोरण लागू केले आहे. याकामी देवळा तालुक्यातील भऊर, विठेवाडी, सावकी, आदी गावातील वाळू उपसा करण्यात येणार असल्याने येथील नागरिकांनी येथील वाळू उपस्याला विरोध दर्शविला आहे. यासाठी रविवारी भऊर येथे याबाबत झालेल्या बैठकीत नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. तसेच वेळप्रसंगी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी नागरीकांनी दिला आहे. बैठकीत भऊर येथील नितीन पवार, काशिनाथ पवार, दिनकर निकम, सुनील पवार विठेवाडी येथील शशिकांत निकम, राजेंद्र निकम यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सुभाष पवार, पांडुरंग पवार, दिनकर निकम, गंगाधर पवार, दादा मोरे, मिलिंद पवार, राजेंद्र पवार, संजय पवार, पोपट पवार, दला पवार, खंडू माळी, नामदेव पवार, रवींद्र पवार, विलास निकम, भास्कर निकम, विठोबा सोनवणे, दादाजी सोनवणे, धना निकम, संजय निकम, काशिनाथ बोरसे, वैभव पवार, श्रावण बोरसे आदी भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : गिरणातील वाळू उपास्याविरोधात भऊर, विठेवाडी, सावकीतील ग्रामस्थ एकवटले appeared first on पुढारी.