नाशिक : गुजरातला जनावरांमध्ये आढळतोय लम्पीस्कीन; पशुपालकांना खबरदारीच्या सूचना

lamiskin www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही गुजरातमध्ये जनावरांमध्ये लम्पीस्कीन नावाच्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने गुजरातलगतच्या जिल्ह्यांमधील पशुपालकांना खबरदारीच्या सूचना दिल्या असून, जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यात या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना लस दिली होती.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी सांगितले की, लम्पीस्कीन डिसीज हा गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील या प्रवर्गात मोडतात. यामुळे अधिकार्‍यांनी पशुपालकांना या आजाराबाबत माहिती देण्याचे निर्देश दिल्याचे डॉ. गर्जे यांनी सांगितले. पशुपालकांनी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी, निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. एखाद्या जनावरात लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय अधिकार्‍यांशी तातडीने संपर्क साधवा, साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाच्या निरोगी भागात प्रवेश टाळावा, तसेच गोठ्यात त्रयस्थाच्या भेटी टाळाव्यात, बाधित परिसरात निर्जंतूक द्रावणाची फवारणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा:

The post नाशिक : गुजरातला जनावरांमध्ये आढळतोय लम्पीस्कीन; पशुपालकांना खबरदारीच्या सूचना appeared first on पुढारी.