नाशिक : गुढीपाडवा, सुटीच्या दिवशी होणार दस्तनोंदणी

गुढीपाडवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गुढीपाडवा (दि. 22) आणि शनिवारी (दि. 25) शासकीय सुटीच्या दिवशी शहरातील सहदुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरू राहतील, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी दिली आहे. शहरातील पक्षकार, बिल्डर व वकील संघाने एप्रिल 2023 पासून वार्षिक मूल्य दर तक्त्यात संभाव्य वाढीच्या दृष्टीने मार्च महिन्यातील शासकीय सुटीच्या दिवशी दस्त नोंदणीकरिता शहरातील दस्त दुय्यम निबंधक कार्यालय सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने शहरातील सहदुय्यम निबंधक वर्ग 2 ची कार्यालये क्रमांक 1 ते 7 सुरू ठेवण्यात आली आहेत. यादिवशी खरेदी विक्री करणार्‍यांनी कामकाज सुरू राहणार असल्याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : गुढीपाडवा, सुटीच्या दिवशी होणार दस्तनोंदणी appeared first on पुढारी.