नाशिक : गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला आक्रमक ; डोक्यावर मोळी घेऊन निषेध

नाशिक : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे व शहराध्यक्ष आनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे, सायरा शेख, पुष्पलता उदावंत, भारती भोई, वर्षा लिंगायत, सरिता पगारे, योगिता आहेर, सुरेखा पठाडे, संगिता पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला पदाधीकाऱ्यांनी डोक्यावर लाकडाची मोळी व गोवऱ्या घेऊन हल्लाबोल करत सरकारचा निषेध केला.

केंद्र सरकारने पुन्हा गृहीणींच्या माथी लाकडाची मोळी लादली आहे. केंद्र सरकारने 50 रुपयांनी गॅस दरवाढ केल्याने आता अधिक पैसे मोजावे लागणार आहे. “बहोत हुई महंगाई की मार !!बस करो मोदी सरकार!!”अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सर्व सामान्य जनतेला गॅस परवडणार नाही म्हणून आंदोलकांकडून लाकडाच्या मोळी व गोवऱ्या भेट देण्यात आल्या. यावेळी, सुवर्णा गांगोडे, शितल भोर, संगिता राऊत, भारती खिरारी, ज्योती भोर, मंगल माळी, सुरेखा कुऱ्हाडे, रूपाली अहिरे,, निशा झनके, रूपाली तायडे, वैशाली ठाकरे यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.

हेही वाचा :

The post नाशिक : गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला आक्रमक ; डोक्यावर मोळी घेऊन निषेध appeared first on पुढारी.