नाशिक : गोरक्षकांच्या मदतीने चार गोवंशांची वाहतूक पोलिसांनी रोखली

गोवंश सुटका मालेगाव

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार छावणी पोलिसांनी बेकायदेशीर जनावरांची वाहतूक रोखली. शुक्रवारी ही कारवाई झाली. गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, विलास जगताप, बहादूर परदेशी यांनी पिकअपमधून (एम. एच. 16, क्यू 5689) चार गोवंशाची राष्ट्रीय एकात्मता चौकातून मोसम पूलमार्गे जुना-आग्रा रोडने मनमाड चौफुलीच्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होणार असल्याची खबर पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांना दिली होती. त्याप्रमाणे पोलिस कर्मचारी कैलास सोनवणे, महेश गवळी, योगेश वायभासे यांनी हॉटेल निसर्गजवळ सापळा रचला. संशयास्पद वाहन येताच त्याची तपासणी करण्यात आली. त्यात चार गोवंश आढळून आले.

मात्र, चालक जनावरांच्या खरेदी व वाहतुकीची पावती सादर करून शकले नाहीत. त्यामुळे संशयित आरोपी विलास प्रकाश वाघ (रा. पाण्याच्या टाकीजवळ, नामपूर) आणि मुकेश विठ्ठल मोरे (रा. वासूळ, ता. देवळा) यांच्याविरुद्ध पोलिस शिपाई कैलास सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली. 35 हजार रुपयांचे गोवंश व वाहन असा 1 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जमा करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : गोरक्षकांच्या मदतीने चार गोवंशांची वाहतूक पोलिसांनी रोखली appeared first on पुढारी.