नाशिक : गोवंश मांस घेऊन जाणारे पिकअप वाहन पोलिसांच्या ताब्यात

पिंपळगाव बसवंत www.pudhari.news

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा

शिरवाडे फाटा शिवारात जवळपास १५०० किलो गोवंश मांस घेऊन जाणारे पिकअप वाहन पकडण्यात पिंपळगाव पोलिसांसह गोरक्षकांना रविवारी (दि.21) रात्रीच्या सुमारास यश आले. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.२२) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पिकअप वाहनासह जवळपास चार लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदवडकडून नाशिकच्या दिशेने गोवंश घेऊन जाणारे वाहन रविवारी (दि.21) रात्रीच्या सुमारास शिरवाडे फाटा परिसरातून जाणार असल्याची माहिती पिंपळगाव पोलिसांना गोरक्षकांनी दिली. पिंपळगाव पोलिसांनी तातडीने शिरवाडे फाटा व पिंपळगाव टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवीत शिरवाडे फाटा परिसरात रात्री १० च्या सुमारास जोरात जाणाऱ्या सफेद रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवंश मांस आढळून आले. वाहनचालक रहीम शेख सरफुद्दीन शेख (३०, रा. आझादनगर, धुळे) यांच्यावर पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताकडून दोन लाख २५ हजार किमतीचे १५०० किलो गोवंश मांसासह दोन लाख रुपयाचे पिकअप वाहन असा जवळपास चार लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पिंपळगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : गोवंश मांस घेऊन जाणारे पिकअप वाहन पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.