नाशिक : गोविंदनगर बोगदा रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची नागरिकांची मागणी

Govindnagar Bogda www.pudhari.news

सिडको : पुढारी वृत्तसेवा

सिटी सेंटर मॉल ते गोविंदनगर बोगदा या रस्त्यावर सतत अपघात होत असून, या रस्त्यावर गतिरोधक आणि आरडी सर्कलजवळ सिग्नल यंत्रणा उभारावी, या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त कैलास चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी व मनपा कार्यकारी अभियंता रौंदळ यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, सिटी सेंटर मॉल ते गोविंदनगर बोगद्यापर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. या रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या शंभर फुटी रस्त्यावर गतिरोधक व सिग्नलची गरज आहे. असा एकही दिवस नाही की, या रस्त्यावर अपघात घडत नाही. या परिसरामध्ये हॉस्पिटल्स, क्लासेस, शाळा, दुकाने मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. या रस्त्यावरील मुख्य चौकांमध्ये गतिरोधक उभारावे तसेच नेहमी वर्दळ असणाऱ्या आरडी सर्कल येथे सिग्नल यंत्रणा उभारावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी नानासाहेब जगताप, समाधान गोडसे, मारुती फड, अशोक गुळवे व नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : गोविंदनगर बोगदा रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची नागरिकांची मागणी appeared first on पुढारी.