नाशिक : गौळाणेत होणाऱ्या बिबट्याच्या वारंवार दर्शनाने नागरिकांमध्ये घबराट

बिबट्या www.pudhari.news

सिडको : पुढारी वृत्तसेवा

शहरात बिबट्याचे दर्शन होत असून मनपा हद्दीतील गौळाणे गावात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे सव्वा महिन्यातच एकाच बंगल्याच्या आवारात बिबट्याने दर्शन दिल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने त्वरीत या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी केली आहे.

गौळाणे गावातील शांताराम चुंभळे यांच्या बंगल्याच्या समोरील रस्त्यावर रविवारी दि.७ रात्री ९ च्या सुमारास बिबट्या रस्त्यावरून फिरताना दिसला. त्यानंतर बिबट्याने बंगल्यातील परिसरात प्रवेश केल्याने त्याचे परिसरात फिरत असलेले चित्र सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याच बंगल्यात दि .२६ जुन रोजी बिबट्याने प्रवेश केला होता. त्यावेळी बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून जखमी केले. त्यानंतरही दि. २ ऑगस्टला रात्री येथील बंगल्याच्या आवारात प्रवेश केला होता. त्याचप्रमाणे रविवारी देखील बंगल्यात प्रवेश केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. बिबट्याने रात्रीच्या वेळी गावातील पाळीव श्वानांवर हल्ला करत फस्त केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू न जाता सतर्कता बाळगावी. फिरताना खबरदारी घेऊन शक्यतो उशिरापर्यंत एकट्याने बाहेर फिरू नये असे आवाहन वनाधिकारी विवेक भदाणे यांनी केले आहे. वनविभागाने बिवट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा उभारण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे, सरपंच अंजिक्य चुंभळे व माजी सरपंच कैलास चुंभळे यांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : गौळाणेत होणाऱ्या बिबट्याच्या वारंवार दर्शनाने नागरिकांमध्ये घबराट appeared first on पुढारी.