Site icon

नाशिक : गौळाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

गौळाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचाराने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गौळाणे येथील शेतकरी शांताराम चुंबळे व लहानु चुंभळे यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्या शिरला, परंतु कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने बिबट्याने तेथून धुम ठोकली.

हा बिबट्या घरातील सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला आहे. आतापर्यंत गौळाणे शिवारात वीस ते पंचवीस वेळा बिबट्या आढळून आलेला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतात काम करण्यासाठी मजूर येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. वनविभागाने त्वरित या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी कैलास चुंभळे, दीपक चुंभळे, शांताराम चुंबळे, लहानू चुंबळे यांनी केली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : गौळाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार appeared first on पुढारी.

Exit mobile version