नाशिक : ग्रामदैवत श्री कालिकामातेच्या चरणी नाशिककर लीन

कालिकादेवी यात्रोत्सव,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सकाळचे आल्हाददायक वातावरण, कानी पडणारे सनईचे मंजूळ स्वर आणि श्री कालिकामातेच्या जयघोषाने निर्माण झालेले चैतन्य अशा भक्तिमय वातावरणात सोमवारी (दि. 26) ग्रामदैवत श्री कालिकादेवीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. आ. फरांदे यांच्या हस्ते सकाळी 7 ला घटस्थापना करण्यात आली. सकाळी 9 ला महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. नवरात्रीच्या पहिल्या माळेचे औचित्य साधत हजारो भाविकांनी श्री कालिकामातेचे दर्शन घेतले.

यंदाच्या वर्षी कोरोना नियंत्रणात असल्याने मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले आहे. श्री कालिका मंदिर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाईसह सजावट करण्यात आली. मंदिरात पहाटे 3 ला काकड आरती करण्यात आली. त्यानंतर पहाटे 5 ला विश्वस्तांच्या हस्ते घटपूजन झाले. दुपारी 12 ला श्रींना नैवेद्य अर्पण करण्यात आला. दुपारी 1 ते 5 या वेळेत महिला मंडळांतर्फे भजनसेवा अर्पण करण्यात आली.

नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई नाका ते त्र्यंबक नाका या भागात लहान मुलांच्या खेळण्यांची, घरगुती वस्तू तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. मानवता क्युरी हॉस्पिटलसमोर पाळणे उभे केले आहेत. परिसराला जत्रेचे स्वरूप आले आहे. दरम्यान, नवरात्रोत्सव यशस्वीतेसाठी संस्थानचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, आबा पवार, किशोर कोठावळे, संतोष कोठावळे, योगेश पवार यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : ग्रामदैवत श्री कालिकामातेच्या चरणी नाशिककर लीन appeared first on पुढारी.