नाशिक : ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; 498 उमेदवार रिंगणात

ग्रामपंचायत निवडणुक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील 40 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी (दि. 4) मतदान होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 498 उमेदवार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मतदानासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा आखाडा रंगत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी 128 ईव्हीएमवर मतदान घेण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रात पाच याप्रमाणे मतदान केंद्र अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तब्बल 870 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीअंती सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. माघारीच्या मुदतीपर्यंत एकूण 258 जणांनी अर्ज मागे घेतले. 114 उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर निवडणुकीच्या अंतिम रिंगणात 498 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मतदार आता कोणाच्या पारड्यात मत टाकणार, हे शुक्रवारी (दि. 5) मतदान मोजणीनंतरच स्पष्ट होईल.

ग्रामपंचायतींची संख्या अशी….

तालुकानिहाय – नाशिक 13, दिंडोरी 13, नांदगाव 06, येवला 04, सिन्नर 02, निफाड 01, चांदवड 01

हेही वाचा:

The post नाशिक : ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; 498 उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.