नाशिक : ग्रामीण पोलिस दलातील पात्र उमेदवारांची यादी जाहिर

पोलिस भरती नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदांसाठी झालेल्या मैदानी चाचणीतून १:१० या प्रमाणानुसार १ हजार ८६१ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. १६४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु असून पात्र उमेदवारांची लवकरच लेखी परीक्षा होणार असून या परीक्षेकडे पात्र उमेदवारांचे लक्ष लागून आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची जानेवारी महिन्यात मैदानी चाचणी घेण्यात आली होती. ग्रामीण पोलीस दलात १६४ रिक्त पदांसाठी ऑनलाईन १८ हजार ९३५ अर्ज आले होते. यातून मैदानी चाचणीसाठी प्रत्यक्ष मैदानावर १३ हजार ८६ उमेदवार उपस्थित होते. यावेळी ११ हजार २४४ उमेदवार हे शारीरिक मोजमापे व कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये पात्र ठरले होते. यातील ४ हजार ५१८ उमेदवारांना २५ व त्याहून अधिक गुण मिळाले. त्यामुळे या उमेदवारांमधून १:१० या प्रमाणात १ हजार ८६१ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आलेले आहे.

लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी (कटऑफ) www.nashikruralpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना भरती संदर्भात शंका असल्यास त्यांनी नाशिक ग्रामीण नियंत्रण कक्ष (०२५३-२२००४०१/२२००४९५/२२००४९९) येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : ग्रामीण पोलिस दलातील पात्र उमेदवारांची यादी जाहिर appeared first on पुढारी.