नाशिक : घंटागाडीने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त

सिडको घंटागाडी www.pudhari.news

सिडको : पुढारी वृत्तसेवा
सिडकोतील रायगड चौकातील मनपा शाळेजवळ गेल्या दोन महिन्यांपासून कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्याने कचरा टाकावा तरी कुठे य चिंतेने नागरिकांना ग्रासले असून, या परिसरातील महिलांनी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली.

पूर्वी नियमितपणे येणारी घंटागाडी गेल्या दोन महिन्यांपासून येत नाही. कधी तरी सायंकाळी ती येते आणि केवळ आवाज करून निघून जाते. घरात दुर्गंधी पसरू नये यासाठी अन्य ठिकाणी जाऊन कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची वेळ आमच्यावर येते आणि यामुळे परिसरात रोगराई पसरल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा महिलांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या प्रश्नात तातडीने लक्ष घालून या परिसरात कचरा उचलण्याची व्यवस्था तातडीने केली जाईल, असे आश्वासन बडगुजर यांनी महिलांना दिले. बडगुजर यांना प्रज्ञा दांडेकर, प्रमिला जाधव, तारा सोनवणे, कल्पना जगताप, कल्याणी बिरारी, कविता बच्छाव, सुवर्णा गाडगीळ, कल्पना पाटील शीतल शिंदे, राणी जाधव यांनी निवेदन दिले आहे.

ऐन दिवाळीत सिडकोतील काही भागांत दिवसाआड घंटागाडी येत आहे. मनपा आयुक्तांनी लक्ष घालून घंटागाडी सुरळीत करावी. अन्यथा आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल. – सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना.

हेही वाचा:

The post नाशिक : घंटागाडीने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त appeared first on पुढारी.