नाशिक : घरात शिरून मुलीचा विनयभंग

महिलेचा विनयभंग,www.pudhari.news

नाशिक : घरात शिरून एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना पंचवटीतील मोरे मळा परिसरात घडली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस ठाण्यात नितीन संतोष जोशी (21, रा. आनंदवली) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित नितीन याने सोमवारी (दि. 3) सायंकाळी 4.30 च्या सुमारास पीडितेच्या घरात शिरून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत असून, पोलिसांनी नितीनला अटक केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : घरात शिरून मुलीचा विनयभंग appeared first on पुढारी.