नाशिक : घोटी रुग्णालयात अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका

घोटी रुग्णालय www.pudhari.news

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
कन्सर्न इंडिया फाउंडेशन संस्थेच्या समन्वयातून व स्टेट बँक ऑफ इंडिया कॅपिटल मार्केट्स लि. संस्थेच्या सीएसआर फंडातून घोटी ग्रामीण रुग्णालयाला फोर्ड मोटर्स या कंपनीची अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट सुविधा असणारी अंदाजे 25 लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. ही रुग्णरुग्णवाहिका सेवेत दाखल झाली.

घोटी ग्रामीण रुग्णालय नियामक नियोजन मंडळाची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत संभाव्य नियोजन करण्यात आले. डॉ. अविनाश गोरे, डॉ. राहुल वाघ व कांचनगाव येथील संतोष गव्हाणे यांनी पुढाकार घेतला. या रुग्णवाहिकेमुळे सर्वसामान्य, आदिवासी रुग्ण, स्तनदा माता यांना जलदगतीने सेवा देता येणार आहे. तसेच रुग्णांना वरदान ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील राठोड, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता गोडसे, पांडुरंग शिंदे, माजी सरपंच संतोष दगडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सदावर्ते आदींनी कामकाजाचा आढावा घेऊन दर्जेदार रुग्णसेवेला प्राधान्य देण्यासाठी सर्वांनी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी एसबीआयचे मार्केटिंग अधिकारी रोशन नेगी, शाखा व्यवस्थापक बियांका नागपाल, अ‍ॅना जॉय, प्रोग्रॅम मॅनेजर सॅन्ड्रा तिरके, कांचनगावचे सरपंच सतीश गव्हाणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : घोटी रुग्णालयात अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका appeared first on पुढारी.