नाशिक : चक्क एसटी रस्त्यात थांबवून बहिणीने भावाचे केलं औक्षण

देवळाली कॅम्प पंचवटी येथील औरंगाबाद चौफुलीवर बस उभी करून बहिण भावाचे औक्षण करताना

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : देवळाली कॅम्प ऐन सणासुदीच्या काळात सुद्धा अत्यावश्यक सेवेतील कर्तव्यावर असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या बहिणीने थेट रस्त्यात एसटी बस उभी करुन आपल्या भावाचे औक्षण करत अनोखी भाऊबीज साजरी केली. यामुळे परिसरात याबाबतची चर्चा पसरली आहे.

देवळाली कॅम्प शिंगवे बहुला येथील अंबादास काळे यांचा भाचा विनीत सुरेश जाधव हे एसटी महामंडळाच्या बसवर चालक म्हणून सेवेत आहेत. त्यांना भाऊबीजेच्या दिवशी सुट्टी नसल्याने ते जव्हार ते औरंगाबाद (संभाजीनगर) ही दुपारी दोनच्या सुमारास घेऊन जात होते. याच दरम्यान काळे यांची मुलगी आणि त्याची मामेबहीण रुचा अंबादास काळे हिने पंचवटी येथील औरंगाबाद चौफुलीवर एसटी बस उभी करून भावाचे ( विनीत सुरेश जाधव) औक्षण केले. तर भावाने ही ओवाळणी देत त्यांना भरभरुन आशिर्वाद दिला आहे. मात्र, या अनोख्या भाऊबीजेची एसटी महामंडळासह परिसरात चर्चा होत आहे.

हेही वाचलंत का? 

 

The post नाशिक : चक्क एसटी रस्त्यात थांबवून बहिणीने भावाचे केलं औक्षण appeared first on पुढारी.