नाशिक : ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमात अखेर गोदावरी नदीचा समावेश

गोदावरी,www.pudhari.news

नाशिक  (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
शासनाच्या ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमात गोदावरी नदीचे नाव नसल्याने गोदाप्रेमींनी नाशिकमध्ये केलेल्या आत्मक्लेश आंदोलनाची दखल घेत शासनाने अखेर या उपक्रमात गोदावरीचे नाव समाविष्ट केल्याने गोदाप्रेमींनी रामकुंड परिसरात आनंदोत्सव साजरा करत भाविकांना पेढे वाटप करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर येथून उगम पावलेली गोदावरी थेट आंध्रप्रदेशापर्यंत जाते. या पवित्र गोदावरी नदीवर दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. मात्र, तरीदेखील शासनाने ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमांतर्गत काढलेल्या अध्यादेशामध्ये गोदावरी नदीचा समावेश केलेला नव्हता. या सरकारी कारभाराचा निषेध करण्यासाठी नाशिकमधील गोदाप्रेमींसह साधू-महंतांनी रामकुंडावर आत्मक्लेश आंदोलन केले होते. त्याची दखल घेत शासनाने नव्याने अध्यादेश काढून ‘चला जाणूया नदीला’ या उपक्रमात गोदावरी नदीचा समावेश केला. त्यामुळे सर्व नदीप्रेमी, पर्यावरणप्रेमी यांनी रामकुंडावर एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नागरिक आणि भाविकांना पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आला. या कार्यक्रमात गोदावरी नदी संवर्धन समितीचे निशिकांत पगारे, राजू देसले, योगेश बर्वे, सोमनाथ मुठाळ, रोहित कानडे, मनोहर अहिरे, अनिल आटवणे आदी पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : 'चला जाणूया नदीला' उपक्रमात अखेर गोदावरी नदीचा समावेश appeared first on पुढारी.