नाशिक : चांदवड तालुक्यात जोरदार पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चांदवड

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात सायंकाळ पासून जोरदार पाऊस सुरू आहे, यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. या पावासामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावरील पूल पाण्यात वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. प्रशासनाच्या वतीने नदी, नाले, तलाव क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पावसामुळे मका, सोयाबीन, कांदा, कांदा बियाणे यांचे प्रचंड नुकसान होणार असून, काढणीस आलेला घास निसर्ग हिरावून घेणार असल्याच्या चिंतेत बळीराजा सापडला आहे.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : चांदवड तालुक्यात जोरदार पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.