नाशिक : चिचोंडी एमआयडीसीमध्ये अफगाणी सुफी मंत्रिकाची गोळ्या झाडून हत्या

file photo

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क : येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक ५ जुलै रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका अफगाणी सुफी मंत्रिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. चिचोंडी एमआयडीसी परिसरात विदेशी अफगाणिस्तानी नागरिक असलेला सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती (वय अंदाजे ३६ वर्ष) या मांत्रिकावर गोळ्या झाडण्यात आल्या.

ही घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून चौघांनी पोबारा केला आहे. या घटनेची माहिती येवला शहर पोलिसांना समजतात सर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक मनोहर मोरे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला.

दरम्यान, रात्री उशिरा नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदींसह पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी देखील तातडीने घटनास्थळी भेटून पाहणी केली.

दरम्यान, या अफगाणिस्तानी मांत्रिकाची चिचोंडी एमआयडीसी परिसरात हत्या का झाली, कशासाठी झाली, घटनास्थळी अघोरी पूजेचा प्रकार कशासाठी करण्यात आला होता, या सर्व बाबी गुंतागुंतीच्या असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रात्री उशिरा फॉरेन्सिक लॅब तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

The post नाशिक : चिचोंडी एमआयडीसीमध्ये अफगाणी सुफी मंत्रिकाची गोळ्या झाडून हत्या appeared first on पुढारी.