नाशिक : चॉपर बाळगणाऱ्या युवकास तीन वर्षे कारावास

न्यायालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चॉपर बाळगणाऱ्या युवकास न्यायालयाने तीन वर्षे साधा कारावास व ११ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सोनल उर्फ लाला रोहिदास भडांगे (२९, रा. मोरे मळा, पंचवटी) असे या आराेपीचे नाव आहे. सोनलच्या घरातून पंचवटी पोलिसांनी सात ऑक्टोबर २०२० रोजी चॉपर जप्त केले होते.

याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात सोनलविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. सी. कासर्ले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. जी. आर. बोरसे यांनी युक्तीवाद केला. आरोपीविरोधात गुन्हा शाबित झाल्याने अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा ए. पाटील यांनी सोनलला शिक्षा सुनावली आहे. या घटल्यात कोर्ट अंमलदार एस. एस. सोनवणे, पी. पी. गोसावी यांनी पाठपुरावा केल्याने आरोपीस शिक्षा लागल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : चॉपर बाळगणाऱ्या युवकास तीन वर्षे कारावास appeared first on पुढारी.