Site icon

नाशिक : चोरटयांनी दुसऱ्यांदा केला 25 हजाराचा पिस्टन पंप लंपास

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा

येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य धनराज शेवाळे यांच्या शेतातील पिस्टन फवारणी पंपाची सोमवारी रात्री चोरी झाली. गेल्या पंधरा दिवसांत अशा प्रकारची दुसरी घटना घडली. शेवाळे यांची लोहोणेर – वासोळ रस्त्यावर सतीखांब शिवारात (गट नंबर 44/2) शेतजमीन आहे. सोमवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या शेतातील सुमारे 25 हजार रुपये किमतीचा पिस्टन पंप पाणी दिलेल्या दोन वावरातून कांदा पीक अक्षरशः तुडवत ओढत नेत पळविला. दहा बारा दिवसांपूर्वीही शेतकरी निंबा पवार यांच्या मालकीचा पिस्टन पंप अज्ञातांनी लंपास केला  असल्याने परिसरात दुस-यांदा पिस्टन पंपाची चोरी झाली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : चोरटयांनी दुसऱ्यांदा केला 25 हजाराचा पिस्टन पंप लंपास appeared first on पुढारी.

Exit mobile version