Site icon

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात श्रीक्षेत्र लहवीत येथे पार पडला. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय अप्पा करंजकर, माजी आमदार योगेश बापू घोलप, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश आबा पिंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दराचार्य डॉक्टर रामकृष्णदास महाराज त्याचबरोबर एन. जी. गायकवाड, प्रवीण पाळदे, वैभव पाळदे, सरपंच सत्यभामा लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य संजय कचरू मुठाळ, शकुंतला ढेरंगे मोरे, सोमनाथ जारस, विठ्ठल डेरिंगे, विठ्ठल काळे, प्राध्यापक नामदेव मुठाळ, त्र्यंबक बोथे, संपत मुठाळ, त्र्यंबकराव मुठाळ, विठ्ठल राव, विनोद जगताप, ग्रामसेवक महाले भाऊसाहेब यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कारही प्रदान करण्यात आले. पुरस्कारर्थींमध्ये श्री ज्ञानेश्वर किसन धांडे, सुनीता आडके, ॲड. सुदाम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ कृष्णा गायकवाड, पत्रकार छायाचित्रकार अशोक गवळी, आर्मीचे जवान कृष्णा साहेबराव मुठाळ, सचिन मनोहर ढेरंगे गावच्या सरपंच सत्यभामा लोहकरे, संजय जाधव, डॉक्टर दीपक सरोदे यांसह राज्यभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून गंगोत्री यमुनोत्री हरिद्वार ऋषिकेश गंगासागर प्रयागराज अशा पवित्र ठिकाणाहून जल आणणाऱ्या पाच महान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये केरू पाटील काकड, प्रभाकर सिताराम गायकवाड, रामा शेठ शेट्टी, जगदीश वाजगे, आणि विजय जैस्वाल यांचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळा समिती व शिवशक्ती मित्र मंडळ तसेच राजमुद्रा स्मारक समिती यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे सादर करण्यात आले. यासाठी जयश्री जाधव, अमृतकर, गौरव बेरड पाटील व यांच्या सर्व समुहाने सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष गजीराम मुठाळ, कार्याध्यक्ष शंकर मुठाळ, उपाध्यक्ष विशाल गायकवाड, खजिनदार विशाल काकड, सचिव बाबुराव काळे यांच्यासह सर्व सदस्य मुकुंद पाळदे, संतोष गावंडे, सोमनाथ मुठाळ, विलास जाधव, संपत मुठाळ, संजय मुठाळ, किरण जाधव, सुनील आहेर, संदीप मुठाळ, संदीप काळे यांच्यासह रिक्षा चालक मार्ग संघटनेचे सर्व सदस्य सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. जयश्री जाधव यांनी प्रास्ताविक तर  गजिराम मुठाळ यांनी आभार मानले.

हेही वाचा:

The post नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात appeared first on पुढारी.

Exit mobile version