Site icon

नाशिक : जनस्थानचे आयकॉन पुरस्कार जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जनस्थानच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयकॉन पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक अनिल दैठणकर, चित्रकार आनंद ढाकीफळे, ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सुरेश गायधनी आणि अभिनेता चिन्मय उदगीरकर यांना जाहीर झाले आहेत. पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी (दि.२२) सायंकाळी ६ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणार आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार उपस्थित राहणार आहेत. १८ ते २४ जूनदरम्यान चित्रप्रदर्शन, गायन, नृत्य अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, त्यामध्ये ‘नातं’ या विषयावर कवितांचा नाट्यमय आविष्कार शुक्रवारी (दि.२३), तर शास्त्रीय रागांवर आधारित गीतांचे सादरीकरण शनिवारी (दि.२४) जूनला होणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जनस्थानचे आयकॉन पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.

Exit mobile version