नाशिक : जागतिक शौचालय दिनानिमित्त नांदगावी स्वच्छ भारत मिशनचे अभियान सुरु

ग्रामीण शौचालय www.pudhari.news

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) च्या दुसऱ्या टप्यातील जागतिक शौचालय दिनानिमित्ताने नांदगाव तालुक्यात सुरवात करण्यात आली आहे. यामध्ये दि. ३ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या आभियाना अंतर्गत सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, सुशोभीकरण, वैयक्तिक शौचालय बांधकाम, अनुदान वितरण, बांधलेल्या शौचालयांचा शाश्वत वापर व होण्याच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे.

तसेच सुधारीत शासन निर्णयानुसार संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची अंमलबजावणी बाबतची कामे देखील करण्यात येणार आहे. दि. १९ नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्याच्या अनुषंगाने, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत, ग्रामीण भागात, सार्वजनिक शौचालय संकुलांचे बांधकाम, घनकचरा तसेच सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय बांधकाम आदी स्वरुपाचे कामे करण्यात येत असून, ही कामे पूर्ण करुन गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात बदल करुन दि. ७ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये सुधारीत मार्गदर्शक सुचना देखील देण्यात आलेल्या आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार नांदगाव तालुक्यात संत गाडगेबाबा अभियान, स्वच्छ भारत अभियान यांच्या कामांची सांगड घालून ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार तालुक्यात जागतिक शौचालय दिन राबविण्यात येत आसुन, या अभियानामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम,नादुरुस्त सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, ग्रामपंचायत कार्यालयातील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, शाळा, अंगणवाडीतील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, वैयक्तीक शौचालय बांधकाम ईत्यादी कामे केली जानार आहे. – गणेश चौधरी, गटविकास आधिकारी, नांदगाव पंचायत समिती.

हेही वाचा:

The post नाशिक : जागतिक शौचालय दिनानिमित्त नांदगावी स्वच्छ भारत मिशनचे अभियान सुरु appeared first on पुढारी.