Site icon

नाशिक : जागेचा वाद, कुटुंबीयांना मारहाण; शिवाजी चुंभळे यांच्यावर गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दुगाव-गिरणारे शिवरस्त्यावर असलेल्या जागेच्या मालकी हक्कातून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी चुंभळे यांच्यासह जमावावर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीत लभडे कुटुंबातील महिलेसह दोन तरुणांना दुखापत झाली असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दशरथ निवृत्ती लभडे यांच्या फिर्यादीनुसार, शेतजमिनीच्या २० गुंठे जागेवरून चुंभळे व लभडे यांच्यात वाद सुरू आहेत. प्रत्यक्षात जागा नसतानाही कागदोपत्री २० गुंठे जागा असल्याचे दाखवून त्या जागेची खरेदी झाली. खरेदी झाल्यानंतर चुंभळे यांनी वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली. त्यातून नाशिक तालुका पोलिस ठाण्यात चुंभळेंविरोधात तक्रार केली होती. दरम्यान, शनिवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास चुंभळे हे जमावास घेऊन आले व त्यांनी जागेची कुरापत काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत विशाल रंगनाथ लभडे, योगेश रंगनाथ लभडे, सरिता अरुण लभडे हे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात शिवाजी चुंभळे, बाजीराव चुंभळे, अजिंक्य चुंभळे, कैलास चुंभळे, रावसाहेब चव्हाणके यांच्यासह 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : जागेचा वाद, कुटुंबीयांना मारहाण; शिवाजी चुंभळे यांच्यावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Exit mobile version