नाशिक : जानेवारीत होणाऱ्या स्काउट गाइड महामेळाव्याकरिता वडांगळीच्या नऊ जणांची निवड

स्काउट गाइड महामेळावा www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या नऊ स्काउटची पाली राजस्थान येथे जानेवारी महिन्यात होणार्‍या 18 व्या राष्ट्रीय जांबोरी स्काउट गाइड महामेळाव्याकरिता निवड झाली आहे.

स्काउट मास्टर विलास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी निकष पूर्ण केले असल्याचे प्राचार्य डी. एस. पवार यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातून स्काउट विभागात गोदावरी माध्यमिक विद्यालय शिंगवे, मराठा हायस्कूल नाशिक, न्यू इंग्लिश स्कूल वडांगळी, जनता विद्यालय पाटोदा, न्यू इंग्लिश स्कूल पंचाळे, के. के. विधाभवन भाऊसाहेब नगर, तर गाइड विभागात लोकनेते शं. बा. वाजे विद्यालय सिन्नर, जिजामाता सटाणा, गीताई वाघ कन्या विद्यालय भाऊसाहेब नगर, सिल्व्हर लोटस स्कूल सिन्नर, शताब्दी इंग्लिश मीडियम आगसखिंड व के. के. वाघ इंग्लिश मीडियम सरस्वतीनगर आदी शाळा सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा संघटक राजेंद्र महिरे, शुभांगी देवरे यांनी दिली. सदर जाम्बोरीत फन अ‍ॅक्टिव्हिटी, साहसी उपक्रम, ग्लोबल व्हिलेज, फूड प्लाझा, गेट सजावट, शिबिर कला, कॅम्प फायर, रांगोळी, पायोनियरिंग, मार्च परेड, कलर पार्टी, लोकनृत्य, शारीरिक प्रदर्शन, राज्य दिवस प्रदर्शन आदी उपक्रम होतील. नाशिकच्या या पथकास राज्य संस्थेचे चिटणीस अरुण सपताळे, जिल्हा आयुक्त तथा शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम, मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, संचालक कृष्णाजी भगत, शिक्षणाधिकारी प्रा. भास्करराव ढोके, पर्यवेक्षक पी. एम. कांबळे, शालेय समिती अध्यक्ष सुदेश खुळे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष योगेश घोटेकर, सरपंच राहुल खुळे आदींसह शिक्षकांनी अभिनंदन केले.

या स्काउटचा समावेश…
वडांगळी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस पथकात सिद्धेश भावसार, गौरव चव्हाणके, आर्यन शिंदे, वैभव खुळे, शार्दूल खुळे, हृषिकेश बर्वे, हर्षल खुळे, अर्पित चव्हाणके, अश्विन कडवे या स्काउटचा समावेश आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जानेवारीत होणाऱ्या स्काउट गाइड महामेळाव्याकरिता वडांगळीच्या नऊ जणांची निवड appeared first on पुढारी.