Site icon

नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनची आज निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा संघ फेडरेशन निवडणुकीसाठी रविवारी (दि.25) मतदान होत आहे. जिल्ह्यातील सात तालुका संचालक तर पाच जिल्हास्तरीय संचालक अशा 12 पदांसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत. गंगापूर रोडवरील व्ही. एन. नाईक संस्थेच्या महाविद्यालयात सकाळी 8 ते 4 या वेळात मतदान होणार आहे. तर सोमवारी (दि.26) द्वारका येथील काशीमाळी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुरेशगीर महंत यांनी दिली.

जिल्हा मजूर फेडरेशनची निवडणूक 4 डिसेंबरला निश्चित करण्यात आली होती. मात्र, गेल्या महिन्यात राज्य शासनाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 29 नोव्हेंबरला निवडणूक आहे. त्या टप्प्यावर स्थगित केली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणीत, खंडपीठाने ही स्थगिती उठविली. त्यामुळे ही निवडणूक 25 डिसेंबरला घेण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आले होते. रविवारी महाविद्यालयातील 14 केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान व मतमोजणीसाठी 100 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली गेली आहे. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे, असे महंत यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय पाच जागा
इतर मागासवर्गीय प्रवर्ग : पवन आहिरराव, अर्जुन चुंभळे, संदीप थेटे, मिलिंद रसाळ
अनुसूचित जाती- जमाती :
शशिकांत उबाळे, हेमंत झोले, किरण निरभवणे, उत्तम भालेराव, रविकांत भालेराव, अशोक रोकडे
भटक्या विमुक्त जाती- जमाती :
बन्सीलाल कुमावत, राजाभाऊ खेमनार, आप्पासाहेब दराडे, सुरेश देवकर, सुदर्शन सांगळे
महिला राखीव प्रतिनिधी (दोन जागा) : दीप्ती पाटील, अनिता भामरे, कविता शिंदे.

तालुकानिहाय मतदार
नाशिक (247), मालेगाव (111), दिंडोरी (56), इगतपुरी (53), त्र्यंबकेश्वर (28), सिन्नर (63), येवला (89), सटाणा (95), निफाड (108), देवळा (46), चांदवड (56), कळवण (45), सुरगाणा (20), नांदगाव (54), पेठ (11) एकूण (1,082).

हे उमेदवार आहेत समोरासमोर
1) सुरगाणा : राजेंद्र गावित विरुद्ध आनंदा चौधरी
2) पेठ : मनोज धुम, भगवान पाडवी, सुरेश भोये
3) येवला : सविता धनवटे विरुद्ध मंदा बोडके
4) देवळा : सुभाष गायकवाड, सुनील देवरे, सतीश सोमवंशी
5) सिन्नर : दिनकर उगले विरुद्ध भारत कोकाटे
6) नाशिक : शर्मिला कुशारे, उत्तर बोराडे, मिलिंद रसाळ, योगेश (मुन्ना) हिरे 7) चांदवड : शरद आहेर विरुद्ध शिवाजी कासव.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनची आज निवडणूक appeared first on पुढारी.

Exit mobile version