नाशिक : जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका अखेर स्थगित

कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील ४४ कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली असून, ३ जानेवारीपर्यंत निवडणुका स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १४ पैकी १३ बाजार समित्यांच्या संचालक मंडळांच्या निवडणुकांचे कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती सहकार प्राधिकरणाने कळविली आहे. यापूर्वी या निवडणुका २९ जानेवारी रोजी घेतल्या जाणार होत्या.

नाशिक बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील तीन तालुक्यांतील 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या असून, हे निर्वाचित ग्रामपंचायत सदस्य बाजार समितीची निवडणूक लढविण्याच्या हक्कापासून वंचित राहावे लागेल, नाशिक बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलावी, अशी याचिका तालुक्यातील सदानंद नवले यांनी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत नाशिक बाजार समितीची निवडणूक १५ मार्चनंतर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत आदेश आलेले आहेत. आता जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, येवला, चांदवड व कळवण बाजार समित्यांसह राज्यभरातील 40 बाजार समित्यांनीदेखील नागपूर खंडपाठीत याचिका दाखल केली होती. या याचिकेत झालेल्या सुनावणीत निवडणुका 3 जानेवारी 2023 पर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश 21 डिसेंबर रोजी देण्यात आले. यासंदर्भासह विविध याचिकेवरील सुनावणींचा संदर्भ देत सहकार प्राधिकरणाने राज्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका 3 जानेवारी 2023 पर्यंत स्थगित करत असल्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयांना दिले आहे. नाशिक उपनिबंधक कार्यालयास याबाबत पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे 13 बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका अखेर स्थगित appeared first on पुढारी.