नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका जिल्हयातील 41 पतसंस्थांच्या निवडणुकांना बसला आहे. सध्या राज्यातील 5,637 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती.

नाशिक जिल्हयातील एनडीएसटी, मविप्र सेवक सोसायटी आदी 41 सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू होती. काही संस्थांमध्ये प्रचार सुरू होता, तर काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम सुरू होते. मात्र, पावसाच्या कारणामुळे राज्य सरकारने राज्यातील 92 नगरपंचायती व नगरपालिकांची निवडणूक स्थगित करणार्‍या सरकारने दुसर्‍याच दिवशी पुन्हा मुसळधार पावसाचे कारण देऊन 5,637 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित केली. यामुळे जिल्ह्यातील ओझर मर्चंटस, पिंपळगाव मर्चंट, येवला मर्चंट, मालेगाव मर्चंट, निफाड अर्बन बँक, लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी पतसंस्था, आप्पासाहेब क्षीरसागर पतसंस्था, समर्थ सहकारी बँक, गणेश सहकारी बँक, जिल्हा महिला सहकारी बँक, गोदावरी सहकारी बँक आदींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. याशिवाय शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या एनडीएसटीसाठी 17 जुलैस मतदान होणार होते. त्यासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात होती. मविप्र सेवक सोसायटी, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था, जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था यांच्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया झाली होती. मात्र, या सर्व संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर appeared first on पुढारी.