नाशिक : जि. प. शाळा बांधकामासाठी सत्तर लाखांचा निधी

जिल्हा परिषद शाळा www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील कोनांबे येथील शाळेच्या बांधकामासाठी 70 लाख रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेला शाळा बांधकामाचा विषय मार्गी लागणार आहे.

शाळेची दुरवस्था झाल्याने सुधारित बांधकाम व्हावे याकामी निधी उपलब्ध व्हावा यासाठी खासदार गोडसे यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. शाळा बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून काही दिवसांतच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. कोनांबे येथे जि. प. प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा असून यात पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. गेल्या काही वर्षांपासून शाळेच्या वर्ग खोल्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी सरपंच विठ्ठल गवारी, स्कूल कमिटीचे अध्यक्ष अंबादास भागवत, उपसरपंच विमल डावरे आदींसह ग्रामस्थांच्या खासदार गोडसे यांची भेट घेतली होती. खासदार गोडसे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेऊन कोनांबे शाळेच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. शाळेसाठी निधी मंजूर झाल्याने कोनांबे येथील ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जि. प. शाळा बांधकामासाठी सत्तर लाखांचा निधी appeared first on पुढारी.