नाशिक : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जुगार अड्डा, मटका

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
लिंगटांगवाडी परिसरात विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अवैध धंद्याची माहिती काढून छापे टाकण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. सदर पथक भागात पेट्रोलिंग करीत असताना पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लिंगटांगवाडी येथे देवा हरीभाऊ जाधव यांच्या मालकीच्या बंगल्यासमोरील बंदीस्त खोल्यांमध्ये छापा टाकला. याठिकाणी जाधव, विकास शांताराम भाटजिरे व योगेश दिनकर खुळे हे 52 पत्याच्या कॅटवर तिरट नावाच्या जुगारावर पैसे लावून खेळ खेळत व इतर 21 जणांना खेळवित असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 13 हजार 300 रुपयांची रोकड, 4 चारचाकी, 2 दुचाकी, 19 मोबाईल व 1 गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतुस असा जवळपास 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

याप्रकरणी देवा जाधव (35, रा. लिंगटांगवाडी), विकास भाटजिरे (35, रा. क्रांती चौक), योगेश दिनकर खुळे (25, रा. वडांगळी), सुरज प्रकाश डेंगळे (25, रा. लिंगटांगवाडी), प्रविण शिवाजीराव पाटील (32, रा. भैरवनाथ सोसायटी, सिन्नर), गुलाब राम जयस्वाल (32, रा. भिवंडी), नारायण शंकर लोंढे (42, रा. लोंढे गल्ली), अर्जुन राम धनगर (38, रा. वैदुवाडी), अजित भास्करराव गिते (33, रा. विजयनगर), शुभम राजेंद्र जंगम (28, रा. वडांगळी), रोहीत विलास खंडीझोड (19, रा. कितांगळी), अविनाश पिराजी अढांगळे (28, रा. वडांगळी), मंगेश काशीनाथ केदार (32, रा. शिवाजीनगर), मयुर त्र्यंबक खालकर (35, रा. शिवाजीनगर), रामप्रसाद शिवाजी खुळे (35, रा. वडांगळी), महेश पोपटराव पगार (25, रा. गोजरे मळा), वाळीबा विठ्ठल गुरकुले (42, रा. डुबेरे), अमित सुनिल गवळी (36, शिवाजी चौक), अभिजीत दत्ता लोळगे (25, रा. सोनार गल्ली), अनीन शेख (32, रा. शिवाजी चौक), योगेश रंगनाथ माळी (रा. मनेगाव), प्रफुल कैलास जाधव (23, लिंगटांगवाडी), अक्षय विलास कदम (20, रा. बेल्हा, आळेफाटा), बापू गुंजाळ (35, रा. आळेफाटा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत appeared first on पुढारी.