नाशिक : जुगार खेळताना पाच जणांवर कारवाई

जुगार अड्यावर छापा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील गावठा परिसरातील विठ्ठलेश्वर मंदिराजवळ पत्त्याचा जुगार खेळत असताना मंगळवारी (दि. 23) रात्री 12.30 च्या सुमारास पाच जणांवर सिन्नर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 6 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

महेंद्र ऊर्फ पिंटू किसन वायचळे (39, रा. गावठा, सिन्नर), अविनाश केशव गवळी (32, रा. लोंढे गल्ली, सिन्नर), गणेश अरुण लोणारे (33, रा. गावठा, सिन्नर), विलास जगन्नाथ पाचोरे (42 , रा. पाचोरेमळा, सिन्नर), आतिष सुरेश भाटजिरे (23, रा. लोंढेगल्ली, सिन्नर) अशी संशयितांची नावे आहेत. गावठा परिसरातील विठ्ठलेश्वर मंदिराजवळ पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी पाच जणांवर कारवाई केली. महेंद्र वायचळे यांच्याकडून 1700 रुपये, अविनाश गवळी यांच्याकडून 1200 रुपये, गणेश लोणारे यांच्याकडून 900 रुपये, विलास पाचोरे यांच्याकडून 1300 रुपये, आतिष भाटजिरे यांच्याकडून 1100 रुपये असा 6 हजार 200 रुपयांचा मुद्देमल, 52 पत्त्यांचे घोड्याचे चित्र असलेले मोकळे पाने पोलिसांनी जप्त केली. याबाबत पोलिस शिपाई बाळू साळवे यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जुगार खेळताना पाच जणांवर कारवाई appeared first on पुढारी.