नाशिक : झाडांना अलिंगन देत केला व्हॅलेंटाईन डे साजरा

सिडको www.pudhari.news
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
व्हॅलेंटाईन डे  हा निसर्गसेवक युवा मंच ने वृक्ष अलिंगन देऊन वृक्ष अलिंगन दिन साजरा केला. आपली ऋतुमानानुसार सणवार साजरी करणारी भारतीय संस्कृती गुरु,माता-पिता व निसर्ग पशुपक्ष्यांनाही सन्मानित करणारे आपले सणवार, युरोपात अनेक शतकांपूर्वी विवाह न करता अनैतिक संबंध ठेवण्याची प्रथा, संस्कृती होती. भारतीय संस्कृतीने प्रभावित होऊन विवाह न करता संबंध प्रस्थापित करण्याच्या कुप्रथेविरुद्ध संत व्हॅलेंटाईन यांनी गावा गावात जाऊन नागरिकांचे प्रबोधन केले व अनेकांचे विवाह लावून दिले. येथील क्रूर राजाने संत व्हॅलेंटाईन यांना फासावर चढविले. पुढे ज्या मुलांचे विवाह लावून आले होते त्यांनी संत व्हॅलेंटाईन यांच्या सन्मानार्थ व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची प्रथा सुरू केली असे सांगितले जाते.
संस्कृती नष्ट करण्यासाठी लढा देणाऱ्या संत व्हॅलेंटाईन यांच्या व्हॅलेंटाईन डे च्यादिवशी इंदिरानगर येथील ज्या झाडांना नाशिककरांनी जीवापाड प्रेम केले. अशा रस्त्याच्या किनारी उभ्या असलेल्या बेल, वड ,पिंपळ, आवळा आदि पर्यावरणपूरक वृक्षांची रस्ता रुंदीकरण करण्यासाठी होणारी अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी इंदिरानगर येथील वृक्षांना अलिंगन देऊन खऱ्या अर्थाने निसर्गसेवक युवा मंचच्या वतीने व्हॅलेंटाईन डे  वृक्ष अलिंगन दिन साजरा केला. यावेळी निसर्गसेवक युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी भारती जाधव,  मनिष बाविष्कार,  रोहित पारख,  पवार  आदि उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : झाडांना अलिंगन देत केला व्हॅलेंटाईन डे साजरा appeared first on पुढारी.