नाशिक : ञ्यंबक पालिका; मुदतवाढ न घेतलेल्या गाळेधारकांची धावपळ

त्र्यंबकेश्वर www.pudhari.news

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

ञ्यंबक नगरपरीषदेच्या मालकीच्या व्यावसायिक गाळयांचा येत्या आठवडयात शुक्रवार (दि.28) रोजी लिलाव करण्यात येणार आहे.

नगर परीषदेकडून मुदत वाढ न घेतलेले आणि थकबाकीमुळे सील केलेले गाळे लिलाव करण्याची जाहीर नोटीस संबंधितांना देण्यात आली आहे. धार्मिक पर्यटन स्थळ असलेल्या ञ्यंबकेश्वर शहरात व्यावसायिक गाळयांना आभाळा एवढे मोल आले आहे. त्र्यंबक नगरपालिका मालकीच्या गाळ्यापैकी 13 गाळे अलीकडच्या कालावधीत लिलावाने देण्यात आले आहेत. तर 153 गाळयांच्या कराराची मुदत काही वर्षांपासून संपली आहे. जून-२०२२ मध्ये नगरपालिकेने याबाबत गाळे धारकांना नोटीस बजावली होती. त्यानंतर काही नेत्यांच्या मध्यस्थीने व्यावसायिकांचा सहानुभूतीने विचार करत जादा अनामत रक्कम भरून व भाडेवाढ करून कराराची मुदत वाढविण्याची संधी देण्यात आली होती. मात्र त्यास अल्प प्रतिसाद मिळाला. तर सुमारे ८० गाळे धारकांनी कोणतीही हालचाल केली नाही.  त्यापैकी त्याच वेळेस ७ गाळेधारक न्यायालयात गेले. मात्र जिल्हा न्यायालयाने त्यांची विनंती अमान्य केली. त्यावर उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. तसेच त्र्यंबक नगरपालिका फंडात मागील तीन वर्षांपासून खडखडाट आहे. अनेकदा बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडीत होण्याची वेळ येते. यासाठी पालिका प्रशासनाने उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. नगरपालिका कार्यालय इमारतीच्या बाजूस असलेला व्यावसायिक गाळ्यासाठी ना परतावा बोलीवर तीन वर्षांसाठी १६ लाख रु. अनामत रक्कम मिळाली आहे. त्यामुळे येथील प्रशासन नव्याने लिलाव करण्यासाठी सज्ज झाली आहे. नगरपरिषदेकडून मुदतवाढ न देण्यात आलेले गाळे व थकबाकीदार यांचे सील केलेले गाळे लिलाव करण्यात येत आहेत. त्यामुळे त्र्यंबक नगरीत आता व्यावसायिक गाळे धारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

त्र्यंबक नगरपालिका मालकीचे 166 व्यावसायिक गाळे
लोकमान्य टिळक व्यापारी संकुल, जवाहारलाल नेहरू व्यापारी संकुल, अमृतकुंभ व्यापारी संकुल, पंचायत समिती कार्यालयाच्या बाजूने आणि बस स्थानकाच्या समोर असलेले  व्यवसायिक गाळे, शिवनेरी धर्मशाळा व्यवसायिक गाळे असे त्र्यंबक नगरपालिका मालकीचे 166 व्यावसायिक गाळे आहेत.

मुदतवाढीसाठी अखेरची संधी..
शुक्रवार (दि.२७) दुपारी ३ पर्यंत वाढीव अनामत रक्कम व भाडे भरून मुदतवाढ घेण्याची संधी आहे. तसेच थकबाकी भरण्याची देखील संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ञ्यंबक पालिका; मुदतवाढ न घेतलेल्या गाळेधारकांची धावपळ appeared first on पुढारी.