Site icon

नाशिक : टीबीमुक्त अभियानासाठी हवेत “निक्षय मित्र’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी ज्या संस्था, व्यक्ती पुढे येतात आणि सहाय्य करतात त्यांना ‘निक्षय मित्र’ म्हटले जाते. प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गंत ‘निक्षय मित्र’ नोंदणीचे आवाहन महापालिकेने केले आहे.

प्रधानमंत्री यांनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी टीबीमुक्त भारत अभियानाची सुरुवात केली. केंद्र शासनाने क्षयरुग्णांना प्रतिव्यक्ती, प्रतिमहिना आवश्यक धान्य, कडधान्य, डाळी, तेल इत्यादी पोषण आहार निक्षय मित्रांच्या मदतीने देण्याचे प्रयोजन केले आहे. त्यामुळे नाशिक शहर, जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, औद्योगिक संस्था, राजकीय पक्ष, शाळा, महाविद्यालये, नागरिक, लोकप्रतिनिधी यांना ‘निक्षय मित्र’ म्हणून नोंद करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी केले आहे.

क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहार द्यावा जेणेकरून रोग बरे होण्याचे प्रमाण वाढेल. यासाठी शहर क्षयरोग केंद्र, जुनी महानगरपालिका इमारत, पंडित कॉलनी, नाशिक या पत्त्यावर तसेच दूरध्वनी क्र. (०२५३) २३१४२५२, ई-मेल dtomhnsc@rntcp.org येथे तसेच महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पोषण आहार बास्केट

विकल्प १ (प्रौढ व्यक्तींसाठी)

ज्वारी/बाजरी/गहू/तांदूळ ३ किलो

डाळ १.५ किलो

खाद्यतेल २५० ग्रॅम

शेंगदाणे १ किलो

विकल्प १ – लहान मुलांसाठी

ज्वारी/बाजरी/गहू/तांदूळ २ किलो

डाळ १ किलो

खाद्यतेल १५० ग्रॅम

शेंगदाणे ७५० ग्रॅम

विकल्प २ – प्रौढ व्यक्तींसाठी

ज्वारी/बाजरी/गहू/तांदूळ ३ किलो

डाळ १.५ किलो

खाद्यतेल २५० ग्रॅम

शेंगदाणे १ किलो

अंडी ३० नग

विकल्प २ – लहान मुलांसाठी

ज्वारी/बाजरी/गहू/तांदूळ २ किलो

डाळ १ किलो

खाद्यतेल १५० ग्रॅम

शेंगदाणे ७५० ग्रॅम

अंडी ३०

हेही वाचा : 

The post नाशिक : टीबीमुक्त अभियानासाठी हवेत "निक्षय मित्र' appeared first on पुढारी.

Exit mobile version