नाशिक : डंपरखाली आल्याने एक ठार

डंपरखाली आल्याने एक ठार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाळू वाहतूक करणार्‍या डंपरखाली चिरडून वृद्ध ठार झाल्याची घटना सिटीसेंटर मॉलजवळ घडली. या अपघातात दिलीप हनुमंत भावे (76, रा. कामटवाडे) यांचा मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी जखमी झाल्या आहेत. शनिवारी (दि. 26) सायंकाळी 6 च्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप भावे हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून घराकडून गंगापूरच्या दिशेने जात होते. उंटवाडी सिग्नल ओलांडल्यानंतर त्यांच्या दुचाकीस एमएच 15, डीके 4847 क्रमांकाच्या डंपरने धडक दिली. धडक बसल्याने भावे दाम्पत्य दुचाकीवरून खाली पडले. त्यात डंपरचे चाक दिलीप भावे यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी रश्मी भावे या जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातामुळे या मार्गावरील दुतर्फा वाहनतळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला जात होता. दिलीप भावे हे निवृत्त सैनिक असून, त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : डंपरखाली आल्याने एक ठार appeared first on पुढारी.