नाशिक : डिप्लोमाच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा

स्पर्धा परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या काळामध्ये डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अभ्यास परिपूर्ण झालेला नसल्याने डिप्लोमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील नापास झालेल्या विद्यार्थ्यांचीही पुन्हा परीक्षा घ्यावी, यासाठी खा. हेमंत गोडसे यांनी उच्च व शिक्षण विभाग प्रशासनाची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव तिडके यांनी खा. गोडसे यांना दिली.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यातच नव्हे, तर देशभरात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झालेला होता. त्यामुळे महाविद्यालये बंद होती. या दरम्यान कॉलेजकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रमाचे धडे शिकवले जात होते. विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाइन पद्धतीने चांगला न झाल्याचा निष्कर्ष काढत शासनाने डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचे आदेश काढले होते. यामुळे डिप्लोमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रम करत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संतापवजा नाराजीचा सूर होता. जिल्ह्यातील डिप्लोमा कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी खा. गोडसे यांची भेट घेत फक्त तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचीच नव्हे तर पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाचा अभ्यासक्रम परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचीही पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी करत होते. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेशही जारी केले आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : डिप्लोमाच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा appeared first on पुढारी.