Site icon

नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टीगेम असोसिएशन आयोजित ऑलिम्पिक सप्ताहास प्रारंभ

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टीगेम असोसिएशन आयोजित उत्तमराव ढिकले स्पोटर्स फाउंडेशन ऑलिम्पिक सप्ताहास प्रारंभ झाला असून या सप्ताहाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा फुटसाल अजिंक्यपद स्पर्धेस सुरुवात होऊन यामधून तैवान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी  शुक्रवार, दि. 30 रोजी खेळाडूंची निवड होणार आहे. पंचवटी येथील मिनाताई ठाकरे इनडोअर सभागृह येथे झालेल्या शानदार उद्घाटनाप्रसंगी टोकियो-2020 ऑलिम्पिकचे निरीक्षक अशोक दुधारे यांसह अ. भा. म. म. संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, एन. डी. एम. जी.ए. चे अध्यक्ष हेमंत पांडे, तांत्रिक समिती फेडरेशनचे अध्यक्ष निहार शहा, सप्ताह प्रमुख आनंद खरे, नाशिक जिल्हा सेपक टकरा असोसिएशनचे सरचिटणीस दीपक निकम, अ. भा. म. म. संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कदम उपस्थितीत होते. तसेच दीपक पाटील, दीपक निकम, खजिनदार संजय पाटील, अविनाश वाघ, ॲड. अनिल गायकवाड, योगेश पाटील, शैलेश रकिबे, सतिष बोरा, शशीभूषण सिंघ, प्रविण घोगरे, सनि रॉय, अमोल राठोड, आनंद चकोर, ऋषिकेश रसाळ, अंकुश सिंग यांची देखील उपस्थिती होती.

The post नाशिक डिस्ट्रिक्ट मल्टीगेम असोसिएशन आयोजित ऑलिम्पिक सप्ताहास प्रारंभ appeared first on पुढारी.

Exit mobile version