Site icon

नाशिक : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक मार्गांत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी वाहतूक मार्गांत बदल केले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी आदेश काढले असून, नाशिकरोड परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने तेथील मिरवणूक मार्गावरील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत. नाशिकरोड येथील मिरवणूक बिटको चौक, क्वॉलिटी स्वीटस, मित्रमेळा कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, देवी चौक, जव्हार मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नाशिकरोड या मार्गावरून जाणार आहे. त्यामुळे या मार्गांवर सर्व वाहनांना प्रवेश मनाई करण्यात आली आहे. यासह पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अनुयायांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंबड व इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहतुकीची समस्या निर्माण होईल. त्यासाठी अवजड वाहनांना प्रमुख रस्त्यांवर मनाई करण्यात आली आहे.

मुख्य मिरवणूक मार्ग
* राजवाडा (भद्रकाली) * वाकडी बारव * महात्मा फुले मार्केट * भद्रकाली मार्केट * बादशाही कॉर्नर * गाडगे महाराज पुतळा * मेनरोड * धुमाळ पॉइंट * सांगली बँक * नेहरू गार्डन * देवी मंदिर शालिमार * शिवाजी रोड * डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा येथे मिरवणुकीचा समारोप होईल.
पर्यायी मार्ग : चौक मंडईकडून वाहने सारडा सर्कलमार्गे जातील. फुले मार्केट ते अमरधाम, टाळकुटेश्वर मंदिर ते पंचवटीकडे वाहने जातील.
– दिंडोरी नाका, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, सांगली बँक मार्गे शालिमार, सीबीएसकडे जाणार्‍या बसेस, अन्य वाहने दिंडोरी नाक्यावरून पेठ फाटा, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल मार्गे सिडको, नाशिकरोडकडे जातील-येतील.

पाथर्डी फाटा
गरवारे पॉइंट ते पाथर्डी फाटा, पाथर्डी सर्कल, कलानगर, फेम सिग्नल रस्त्यावर दोन्ही बाजूने, तसेच पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटा मार्गे डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरून अंबड-सातपूर लिंक रोडवर अवजड वाहनांना मनाई असेल. तर, नम्रता पेट्रोलपंप ते पाथर्डी फाटा रस्त्यावर दोन्ही बाजूने सर्व वाहनांना मनाई असेल.
पर्यायी मार्ग : गरवारे पॉइंटपूर्वीच्या ओव्हर ब्रीजमार्गे द्वारका, फेम सिग्नल ते द्वारकावरून ओव्हर ब्रीजमार्गे गरवारे, पाथर्डी गाव ते सातपूर-अंबडकडे जाण्यासाठी राणेनगरकडे जाणार्‍या रस्त्यावरून मार्गस्थ व्हावे. तसेच अंबडकडून येणारी वाहने पोलिस स्टेशनमार्गे महामार्गावर येतील.

नाशिकरोड परिसर
उड्डाणपुलावरून खाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे येणारा मार्ग. दत्त मंदिराकडून बिटको सिग्नलकडे येणारा मार्ग. यासह रेल्वे स्टेशनकडून बिटकोकडे येणारा मार्ग बंद असेल.
पर्यायी मार्ग : सिन्नर फाट्याकडून येणारी वाहने उड्डाणपुलावरून थेट बिटको चौकाकडे जातील. दत्त मंदिर चौकातून सुराणा हॉस्पिटल, आनंदननगरी टी पॉइंट, सत्कार पॉइंट, रिपोर्टे कॉर्नरमार्गे रेल्वे स्टेशनकडे जातील. रेल्वे स्टेशनकडील वाहने सुभाष रोडमार्गे दत्त मंदिर व पुढे मार्गस्थ होतील. तसेच नाशिक-पुणे वाहतूक दत्त मंदिर सिग्नलवरून उड्डाणपूलमार्गे मार्गस्थ होईल. नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरातील बसेस दत्तमंदिर सिग्नलमार्गे सुभाष रोडवरून जातील. सीबीएसकडे येणारी वाहने नाशिकरोड न्यायालयासमोरून सरळ आर्टिलरी रोडमार्गे जय भवानी चौकातून उजवीकडे वळून उपनगर सिग्नलमार्गे पुढे जातील.

हेही वाचा:

The post नाशिक : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक मार्गांत बदल appeared first on पुढारी.

Exit mobile version