नाशिक : तरुणानं चक्क छातीवर गोंदला मुख्यमंत्र्यांचा टॅटू

छातीवर गोंधली मुख्यमंत्र्यांची प्रतिमा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

कार्यकर्ते हे नेहमीच आपल्या नेत्यांप्रती आपली असलेली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी आपल्या नेत्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते अनेकदा नवनवीन प्रयोगही करत असतात. अशातच एका तरुणानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा चक्क छातीवर गोंदली आहे.

एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत या तरुणाने काढलेले फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या फोटोत हा तरुण श्रीकांत शिंदे यांच्यासोबत उभा असून त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा असलेला टॅटू छातीवर गोंदला आहे. मुख्यमंत्र्यांना त्याने दैवत असे संबोधून आपल्या छातीवर तसे कोरले आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील वैभव शिंदे या युवकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी छातीवर काढला टॅटू ! या मथळ्याखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत तरुणाने काढलेला हा फोटो
चांगलाच व्हायरल होतो आहे.

वैभव शिंदे असे या तरुणाचे नाव असून तो नाशिक जिल्ह्यातील असल्याचे बोलले जात आहे. तशी पोस्टही सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र, तो नाशिक जिल्ह्यातीलच असल्याची खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाही.  यापूर्वीही पंढरपूर येथील बालाजी भांडे नावच्या तरुणाने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा आपल्या छातीवर गोंदली होती. त्यावेळीही तो विषय चांगलाच चर्चेत आला होता. अशा प्रकारे टॅटू काढून कार्यकर्ते आता नेत्यांप्रती असलेली निष्ठा दाखविण्याचा प्रयत्न करु लागले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : तरुणानं चक्क छातीवर गोंदला मुख्यमंत्र्यांचा टॅटू appeared first on पुढारी.