नाशिक : त्यांनी 68 व्या वर्षी मिळवली पीएच.डी.

पीएचडी www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील खडांगळी येथील सीए तुकाराम ठोक यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये वयाच्या 68 व्या वर्षी पीएच.डी. मिळवली.

तुकाराम ठोक हे खडांगळी (ता. सिन्नर) या गावचे असून, ते गेली 46 वर्षे पुण्यात वास्तव्यास आहे. एका कंपनीत उच्च पदावर नोकरी केल्यानंतर आता सीए या व्यवसायाची तेथे प्रॅक्टिस करतात. त्यांनी आतापर्यंत बी. कॉम, जी. डी. सी. अ‍ॅण्ड ए. एल. एल. बी. (जन ). एम. डी. बी. ए. एफ. सी.ए. एफ. सी. एस. ए. सी. आय. एम. (लंडन) व आता बिझनेस इकॉनॉमिक्स पीएच.डी. ही पदवी संपादन केली. वयाच्या 68 व्या वर्षी ही त्यांची शिक्षणाची ओढ कायम आहे. अतिशय गरीब शेतकरी व एकत्र कुटुंबात वाढलेल्या व आई-वडिलांना मुलांना शिकवण्याची जिद्द असल्याने त्यांनी अनेक संकटे पार करीत शिक्षणाची गंगा आपल्या कुटुंबासह गावात आणली व या वयात पीएच.डी. पदवी मिळवली. म्हणतात ना शिक्षणाला वय लागत नाही, हे वाक्य तुकाराम ठोक यांना पाहिल्यावर समजते. ते आपल्या यशाचे श्रेय शिक्षकांना, वडीलधार्‍या मंडळींना, हितचिंतकांना, नातेवाइकांना, मुले, सुन, जावई व पत्नी सुलोचना यांना देतात.

हेही वाचा:

The post नाशिक : त्यांनी 68 व्या वर्षी मिळवली पीएच.डी. appeared first on पुढारी.