नाशिक : त्र्यंबकला जलाशयांवर आभाळमाया

त्र्यंबक अहिल्या धरण,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, ब्रह्मगिरीच्या पायथ्याला असलेले अहिल्या धरण ओव्हरफ्लो झाल्याने गोदावरीची पाणीपातळी वाढली आहे, तर गंगासागर तलावाची पातळीदेखील वाढत आहे. त्यामुळे पाऊस सुरूच राहिला, तर एक – दोन दिवसांत गंगासागर ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. ब्रह्मगिरीसह गंगाद्वार परिसरातील सर्व ओहळ, नाले, धबधबे खळाळून वाहात आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीन मंडलांत पर्जन्यमापन केले जाते. त्यामध्ये वेळुंजे मंडलात सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला आहे. हरसूल परिसरात त्र्यंबकेश्वरपेक्षा जास्त पाऊस आहे. शनिवारी (दि. 9) सकाळी झालेल्या नोंदीनुसार, त्र्यंबकेश्वर 96 मिमी, वेळुंजे 148 मिमी, हरसूल 127 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

धरण भरले, तरी एक दिवसाआड पाणी
त्र्यंबकेश्वर शहराच्या पाचआळी भागाला अहिल्या धरणातून पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात या धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. त्यानंतर त्र्यंबकेश्वर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता धरण भरले असून, नगरपालिकेने एक दिवसाआड पाण्याचे नियोजन बदलून नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : त्र्यंबकला जलाशयांवर आभाळमाया appeared first on पुढारी.