नाशिक : त्र्यंबकेश्वरला गंगासागरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मृतदेह,www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील संत निवृत्तिनाथ मंदिराच्या बाजूस असलेल्या गंगासागर तलावात 45 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. गंगासागर तलावातील पाणी कुशावर्तासाठी बॅक स्टोरेज म्हणून वापरण्यात येते. रविवारी (दि. 21) सकाळी 7 च्या सुमारास तलावावरील सुरक्षारक्षकास तलावात काही तरी तरंगत असल्याचे निदर्शनास आले. त्याने जवळ जाऊन निरखून पाहिले असता, महिलेचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर त्याने नगरपालिका व पोलिस ठाण्यास याबाबत माहिती कळविली. पोलिसांनी तत्काळ धाव घेत पंचनामा केला. या महिलेचे नाव व पत्ता समजू शकला नाही. मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मागदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : त्र्यंबकेश्वरला गंगासागरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.