नाशिक : त्र्यंबक शिवारात भाताची गंजी खाक

भाताची गंजी www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावरील तळेगाव-त्र्यंबक शिवारातील मंगळू जाधव यांच्या शेतातील कापून ठेवलेल्या भाताच्या गंजीला दुपारी 3 च्या सुमारास अचानक आग लागल्याने संपूर्ण गंजी जळून खाक झाल्याने सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाचा जोर कमी झाल्यानंतर जाधव यांनी सोंगणी सुरू केली होती. सोंगलेल्या भाताची गंजी शेतात रचून ठेवलेली होती. शनिवारी (दि.5) दुपारी अचानक त्यास आग लागताच मंगळू जाधव यांच्या शेतातील झोपडीतील लहान मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे शेतकरी धावून आले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण गंजीने पेट घेतला होता. दरम्यान त्या भागात फिरायला आलेले वृत्तपत्र वितरक सुधीर वाघ यांनी तातडीने महसूल विभागाशी संपर्क साधला व घटनेची माहिती दिली. दरम्यान तलाठी डोंगरे यांनी प्राथमिक अहवाल सादर केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : त्र्यंबक शिवारात भाताची गंजी खाक appeared first on पुढारी.