नाशिक : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला एलसीबीने केले जेरबंद; एकजण फरार

सुरगाणा www.pudhari.news

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा

सुरगाणा शहरानजीक मोतीबागेजवळ सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले असून एकजण फरार झाला आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शिरोळे, पोलीस हवालदार सानप, पोलीस शिपाई प्रदिप बहिरम यांच्या पथकाने लावलेल्या सापळा लावला. त्यानंतर रात्री मोतीबाग जवळ रस्त्याच्या कडेला दोन चारचाकी बोलेरो जीप एम.एच.१५, ईपी १७४६, टाटा कंपनीची नेक्सान एम.एच. १७,सीआर ५९८८ ही वाहने संशयितरित्या पोलिसांना आढळून आल्याने त्यांची झडती घेतली असता एक पिस्तूल, एक जिवंत काडतुस, धारदार हत्यार, कटर, महागडे मोबाईल पाच, लाकडी दांडके अशी हत्यारे आढळून आली. एकोणीस लाख, सत्तर हजार सहाशे रुपयांचा असा मुद्देमाल आढळून आला आहे. यामध्ये आरोपी गणेश रामभाऊ जगताप (रा. नांदुर्डी ता. निफाड), दिपक किसन जोरवेकर (रा. संगमनेर), सिताराम उर्फ प्रमोद सोमनाथ कोल्हे (रा. घुलेवाडी ता. संगमनेर), प्रशांत शशिकांत अहिरे (रा. जेलरोड, नाशिक), सोमनाथ संजय भोये (रा. मुळाणे, वणी ता. दिंडोरी), गोविंदा लक्ष्मण महाले (रा. सुरगाणा शहर) अशी पाच आरोपींची नावे असून यापैकी गोविंद महाले हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिरोळे, पोलीस हवालदार सानप, पोलीस शिपाई प्रदीप बहिरम यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस अधिक्षक शहाजी उमाप अप्पर पोलिस अधिक्षक माधुरी कांगणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक हेमंत पाटील, सुरगाणा पोलिस निरिक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर नांद्रे पुढील तपास करीत आहेत. तर आरोपींना दिंडोरी सत्र न्यायालयात उभे केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला एलसीबीने केले जेरबंद; एकजण फरार appeared first on पुढारी.